पुणे : नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आपल्यापैकी काही जणांनी अनेक परीक्षा, मुलाखतीही दिल्या असतील तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक येथे मुत्रपिंड विकार शस्त्रक्रिया विशारद, मुत्रपिंड उपचार सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत वैद्यकीय अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक स्व. इंदिरा गांधी चौक, शालीमार, नाशिक ४२२००१ येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1२५000 पर्यंत पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nashik.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात…
– पदाचे नाव : मुत्रपिंड विकार शस्त्रक्रिया विशारद, मुत्रपिंड उपचार
– रिक्त पदे: 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– वेतन / मानधन : मुत्रपिंड विकार शस्त्रक्रिया विशारद: रुपये १२५००००/- दरमहा (एकत्रित), मुत्रपिंड उपचार भिषक: रुपये १२५०००/- दरमहा (एकत्रित)
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : १० सप्टेंबर २०२५ सकाळी ११:०० वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक स्व. इंदिरा गांधी चौक, शालीमार, नाशिक ४२२००१.


