Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

WhatsApp वर येतंय नवीन Update; तुम्ही Close Friends सोबत करू शकता स्टेट्स शेअर

WhatsApp वर येतंय नवीन Update; तुम्ही Close Friends सोबत करू शकता स्टेट्स शेअर

नवी दिल्ली : सध्या WhatsApp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यानुसार, कंपनीकडून युजर्ससाठी अनेक फीचर्सही आणले जात आहेत. त्यात आता कंपनीकडून त्यांचे स्टेट्स अपडेट्स अधिक वैयक्तिक बनवले जाणार आहे.

‘क्लोज फ्रेंड्स’ फीचर लवकरच WhatsApp मध्ये येणार आहे, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांचे स्टेट्स फक्त निवडक मित्रांसोबत किंवा विश्वासू संपर्कांसोबत शेअर करू शकतील. हे फीचर इंस्टाग्रामच्या ‘क्लोज फ्रेंड्स स्टोरीज’ सारखे असेल. WhatsApp स्टेट्स इन्स्टाग्राम स्टोरीजसारखे काम करते, जिथे फोटो, शॉर्ट व्हिडिओ किंवा टेक्स्ट अपडेट पोस्ट करता येतात. हे अपडेट्स 24 तासांसाठी दिसतात आणि नंतर आपोआप गायब होतात.

मेटाच्या डेटानुसार, अमेरिकेत त्याची लोकप्रियता कमी असली तरी, जगभरातील १.५ अब्जाहून अधिक लोक दररोज WhatsApp स्टेटस अपडेट करतात. सध्या, WhatsApp स्टेटस शेअर करण्यासाठी तीन सिक्रेट पर्याय देते.

यामध्ये, तुम्ही सर्व संपर्कांसोबत अपडेट शेअर करू शकता, काही लोकांना वगळू शकता किंवा फक्त निवडक संपर्कांना अपडेट दाखवू शकता. “Only Share With” हा पर्याय आधीच उपलब्ध आहे, परंतु नवीन Close Friends फीचरमुळे ही प्रक्रिया सोपी होईल, कारण त्यात एक यादी तयार करता येईल. याने फायदा होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!