बटाटे हा एक भाजीचा प्रकार आपल्यापैकी अनेकांना आवडत असेल. हे बटाटे कुरकुरीत फ्राईजच्या स्वरूपात खाता येतात किंवा मसालेदार भाज्यांच्या स्वरूपातही खाता येतात. पण जेव्हा बटाटे अंकुरतात किंवा त्यावर लहान अंकुर येतात तेव्हा ते खावे की नाही हा प्रश्न पडतो. मात्र, अशाप्रकारचे बटाटे न खाणेच फायद्याचे ठरू शकते.
बहुतेक लोक दररोज बटाटे खातात. अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे विषारी असू शकतात आणि आरोग्याला अपाय करू शकतात. हे खरे आहे की, अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे सोलानाइन आणि चाकोनाइन नावाचे नैसर्गिक रसायने असतात. जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते मळमळ, उलट्या, अतिसार किंवा पोटदुखी होऊ शकतात. असे बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
परंतु, एक किंवा दोन लहान अंकुरलेले बटाट्यां मध्ये या दोन्ही रसायनांचे प्रमाण खूप कमी असते आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकत नाही. अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे फक्त मोठ्या प्रमाणात खाणे धोकादायक असू शकते. अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे विषारी असतात असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. मात्र, निरोगी आरोग्यासाठी अंकुरलेेले बटाटे न खाल्ल्यास आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.


