Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune PMPML Accident: पुण्यातील ABC चौकात PMPML काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; भरधाव बस दुकानात शिरली

Pune PMPML Accident: पुण्यातील ABC चौकात PMPML काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; भरधाव बस दुकानात शिरली

Pune PMPML Accident: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात (ABC) मंगळवारी दुपारी एका भरधाव पीएमपी बसने दुकानाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा बस चालकाने केला होता, मात्र प्रशासनाच्या प्राथमिक तपासात हा दावा फोल ठरल्याने संबंधित चालकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

भरधाव बस थेट दुकानात; ७ दिवसांत चौकशीचा आदेश
वडगाव ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी ही बस अप्पा बळवंत चौकात आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याकडेच्या दुकानात शिरली. या घटनेची गंभीर दखल घेत पी​एमपी प्रशासनाने चालक बाळू चव्हाण याला दोषी धरत निलंबनाची कारवाई केली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सह-व्यवस्थापकीय संचालिका ॲलिस पोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. प्राथमिक तपासात बसचे ब्रेक व्यवस्थित असल्याचे आढळले असून, तांत्रिक स्पष्टतेसाठी RTO अहवालाची प्रतीक्षा आहे. समितीला पुढील 7 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीएमपीची आर्थिक स्थिती खालावली; ४८५ कोटींचा भार पालिकेवर
एककीकडे अपघातांच्या घटनांमुळे पी​एमपी चर्चेत असतानाच, दुसरीकडे महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षातील 484.96 कोटी रुपयांची संचलन तूट भरून काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महामंडळाची एकूण अंदाजित तूट 808.26 कोटी रुपयांवर पोहोचली असून, त्यापैकी 60% वाटा या नात्याने महापालिका दरमहा 39.50 कोटींचे 12 हप्ते देणार आहे. तसेच, इंधन पुरवठा खंडित होऊ नये म्हणून MNGL ची थकबाकी फेडण्यासाठी 10 कोटी रुपये आगाऊ दिले जाणार आहेत.

वाढत्या तुटीमुळे विकासकामांवर ताण
पी​एमपीच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शहराच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे. इंधन दरातील सततची वाढ, जुन्या बसची देखभाल आणि वाढता संचलन खर्च ही या तुटीमागची प्रमुख कारणे आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टिकवण्यासाठी महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजावे लागत असल्याने, याचा थेट परिणाम शहराच्या इतर विकासकामांच्या बजेटवर होत असल्याचे चित्र आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!