Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुमची दृष्टी कमकुवत झालीये? तर दररोज ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश, होईल फायदा…

तुमची दृष्टी कमकुवत झालीये? तर दररोज ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश, होईल फायदा…

आपले डोळे अर्थात त्यातून मिळणारी दृष्टी याने आपल्याला जग पाहिला मिळते. डोळे निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली. ज्याप्रमाणे शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पोषण आवश्यक असते, त्याचप्रमाणे डोळे निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी हेल्दी फूड्स महत्वाचे असते. ज्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट्स असतात, जे रेटिना आणि लेन्सचे पोषण करतात आणि डोळ्यांवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. पालक, मेथी यांसारख्या भाज्यांचा समावेश करावा. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे दोन विशेष संयुगे असतात. हे डोळ्यांना हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतात आणि रेटिना निरोगी ठेवतात. ज्यामुळे दृष्टी दीर्घकाळ टिकते.

मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध असतात. ते कोरडे डोळे ठेवत नाही आणि रेटिना पेशींना चांगले कार्य करण्यास मदत करते. यामुळे वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांचा धोका देखील कमी होऊ शकतो. संत्री, लिंबू आणि सिमला मिरची सारखी लिंबूवर्गीय फळे ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध असतात. ते डोळ्यांच्या पेशी मजबूत करतात, कोलेजन तयार करण्यास मदत करतात आणि मोतीबिंदू दूर ठेवण्यास मदत करतात.

याशिवाय, अंड्यातील पिवळ्या भागामध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचे प्रमाण चांगले असते. त्यात असलेले नैसर्गिक फॅट्स शरीरात हे पोषक घटक सहजपणे शोषण्यास मदत करते. त्याचा डोळ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!