Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई व कोकणात पावसाने तात्पुरती विश्रांती घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून पूरसदृश परिस्थिती कायम आहे. वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान मुंबई, उत्तर कोकण आणि अंतर्गत महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र 16 सप्टेंबरपासून कोकणात पावसाचा जोर कमी होऊन केवळ हलक्या सरींची शक्यता राहील.
जिल्हानिहाय परिस्थिती
चंद्रपूरमध्ये 24 तासांत 28 मिमी पाऊस नोंदवला गेला. नद्या व धरणांची पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांसाठी पूर सतर्कता जारी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 96.2 टक्के पाऊस झाला आहे. सोलापूर मध्ये अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात मुसळधार पावसामुळे ओढे वाहू लागले आहेत. याशिवाय, धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील 42 पैकी 23 मंडळे प्रभावित झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
11 Sept,IMDच्या मॉडेल मार्गदर्शन नुसार, #१३_ते_१५ तारखेपर्यंत #अंतर्गत_महाराष्ट्र व #उत्तर_कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता; ज्यामध्ये #मुंबई व आसपासच्या भागात पावसाची शक्यता समाविष्ट आहे.
१६ नंतर कोकणात कमी तिव्रतेने पाऊस सुरू राहू शकतो
कृपया #आयएमडी अलर्ट पहा pic.twitter.com/ZUt07oxrlO— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 11, 2025
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई व कोकणात हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तथापी, 13-15 सप्टेंबर दरम्यान, अंतर्गत महाराष्ट्र व उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच 16 सप्टेंबरपासून कोकणात पावसाची तीव्रता कमी होणार आहे.


