पुणे : नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी’, पुणे येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी’, पुणे येथे भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी सल्लागार, फील्ड / प्रयोगशाळा सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक आणि सहयोगी अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर किंवा पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.tropmet.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, सदर मुलाखत ही मुलाखतीची तारीख १७, १८ आणि १९ सप्टेंबर २०२५ असणार आहे. त्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, डॉ. होमी भाभा रोड, एनसीएल आणि एआरडीई पाषाण दरम्यान स्थित, पुणे-४११००८. / सोलापूरसाठी – एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर, क्रमांक ३८, गट, १ बी, सोलापूर विद्यापीठासमोर, सोलापूर-पुणे महामार्ग, केडगाव, महाराष्ट्र ४१३२५५ येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.


