पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे जनरल मॅनेजर, अंतर्गत लेखापरिक्षक, शाखा व्यवस्थापक, लिपिक, मार्केटिंग ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
25 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत maharashtranagaribank@gmail.com या मेल आयडीवर अर्ज पाठवता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : जनरल मॅनेजर, अंतर्गत लेखापरिक्षक, शाखा व्यवस्थापक, लिपिक, मार्केटिंग ऑफिसर
⇒ एकूण रिक्त पदे : 07 पदे.
⇒ नोकरीचे ठिकाण : लातूर.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (पोष्टाद्वारे) / ऑनलाइन (ई-मेल).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२५
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२.


