Suraj Chavan Mystery Girl: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सुरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसमध्ये मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. अलीकडेच सुरजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 17 सप्टेंबरला सुरजने एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर, त्याच मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओही त्याने पोस्ट केला, पण व्हिडिओमध्ये तिचा चेहरा दाखवला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती नेमंकी कोण आहे? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हिडिओमध्ये सुरज आणि तरुणीने साउथ इंडियन स्टाइलचा पेहराव केला होता. सुरजने ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉगवर डबस्मॅश केला आहे. बिग बॉस दरम्यान त्याने अनेकदा त्याच्या प्रेमभंगाबाबत खुलासा केला होता, त्यामुळे आता पुन्हा त्याच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री झाली आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसेच, हे फक्त रीलसाठी का आहे, की खरी घटना आहे? याचीही उत्सुकता आता चाहत्यांना लाहली आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठी 5 मध्ये असताना सुरजचे लोकप्रिय डायलॉग्स ‘गुलीगत धोका’ आणि ‘गुलीगत टेंगूळ’ प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्याचा झापुक झुपूक डान्स स्टेप देखील चाहत्यांच्या पसंतीस उतला. बिग बॉस जिंकल्यानंतर सुरजने चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली, परंतु सिनेमाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.


