Today रविवार, 20th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा! मुंबईत महायुती; पण बाकी सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा! मुंबईत महायुती; पण बाकी सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

Local Body Elections: विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, मुंबईतील निवडणुकीत महायुतीसोबत स्पर्धा करण्याचा विचार सुरू आहे, मात्र उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी स्वबळावर उमेदवार उभे करेल. स्थानिक नेत्यांना ठरवायचे असेल तर त्यांनी इतर पक्षांशी युती केली तरी आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे पटेल यांनी सांगितले. तसेच, मेघालय, मणिपूर आणि बिहारसह अनेक राज्यांमध्येही पक्ष राष्ट्रीय स्तरावर आपली उपस्थिती दाखवेल, असंही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा – BJP Shiv Sena Clash : भाजप-शिवसेना शिंदे गटात फ्री-स्टाईल हाणामारी, महापालिका निवडणुकीआधीच पडली ठिणगी; नेमकं काय घडलं?

विदर्भातील राजकारणावर भाष्य करताना प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्र्यांना थेट सुनावले. विदर्भात फक्त पर्यटक म्हणून येण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. नाहीतर दोन तास जिल्ह्यात येऊन फक्त दौरा करून परत जाण्याला काही अर्थ नाही, असंही पटेल यांनी म्हटलं.

हेही वाचा – Local Body Election Date: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश; ‘या’ महिन्यात पार पडणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

पालकमंत्र्यांचे कामकाज पक्षाच्या विस्ताराला पूरक ठरले पाहिजे, असा स्पष्ट इशारा देत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘मंत्री कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधून काम करायला हवे. अन्यथा आमच्या पक्षाचा पाया कमकुवत राहील. अजूनही अनेक ठिकाणी आमच्या मंत्र्यांकडून संघटन बळकट करण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही.’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!