Local Body Election Date: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दीर्घकालीन विलंबावर अखेर न्यायालयाने निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाला अखेरची तारीख निश्चित करण्याचे आदेश दिले.
याआधी, मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या कालावधीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते, मात्र पावसामुळे आणि इतर अडचणींमुळे त्या विलंबित झाला होता. तथापी, ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित निकालामुळे देखील 2022 पासून निवडणुका लांबलेल्या होत्या.
हेही वाचा – पुण्यात आयकर विभागाची मोठी कारवाई! कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवरच्या कार्यालयावर टाकले छापे
न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रभाग रचना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही न्यायायलाने सांगितले असून नोव्हेंबरमध्ये EVMची पूर्तता करणेही अनिवार्य असल्याचे निदर्शनास आणले. तथापी, निवडणूक आयोगाने बोर्ड परीक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावाचे मुद्दे मांडले, परंतु न्यायालयाने फक्त बोर्ड परीक्षेच्या कारणास मान्यता दिली नाही. या आदेशानंतर, पुढील चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित केल्या जातील, असे संकेत मिळाले आहेत.


