Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Lift Collapses: पुण्यात वाघोलीतील अर्बनो सोसायटीत लिफ्ट कोसळली; 6 जण जखमी, रहिवाशांकडून बिल्डरविरोधात तक्रार

Pune Lift Collapses: पुण्यात वाघोलीतील अर्बनो सोसायटीत लिफ्ट कोसळली; 6 जण जखमी, रहिवाशांकडून बिल्डरविरोधात तक्रार

Pune Lift Collapses: पुण्यातील वाघोली परिसरातील एका उंच इमारतीत शनिवारी सायंकाळी भीषण घटना घडली. अर्बनो नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये लिफ्ट कोसळल्याने रहिवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. ही घटना 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण 6 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये त्या वेळी तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असे एकूण सहा जण प्रवास करत होते. चौथ्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी ते सर्वजण लिफ्टमध्ये चढले होते. मात्र, दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्ट अचानक आवाज करत थेट खाली कोसळली.

या अपघातामुळे लिफ्टमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला. या अपघातात लिफ्टमधील लोकांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताचा थरारक क्षण लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेनंतर सर्वजण सुखरूप बाहेर आले असले तरी संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रहिवाशांनी सांगितले की, इमारतीचा ताबा घेतल्यापासून लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत होते. कधी ती मध्येच अडकायची, तर कधी दिवे आणि बटणे काम करायचे थांबायचे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागत होता.

पहा व्हिडिओ – 


रहिवाशांनी यापूर्वी अनेकदा बिल्डरकडे तक्रारी केल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या भीषण अपघाताला सामोरे जावे लागले, असा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी वाघोली पोलिस ठाण्यात अर्ज दाखल करून बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!