Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP Shiv Sena Clash : भाजप-शिवसेना शिंदे गटात फ्री-स्टाईल हाणामारी, महापालिका निवडणुकीआधीच पडली ठिणगी; नेमकं काय घडलं?

BJP Shiv Sena Clash : भाजप-शिवसेना शिंदे गटात फ्री-स्टाईल हाणामारी, महापालिका निवडणुकीआधीच पडली ठिणगी; नेमकं काय घडलं?

कल्याण : आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. सोमवारी (१५ सप्टेंबर ) रात्री शहाड परिसरात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) च्या कार्यकर्त्यांमध्ये नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा बॅनरवरून जोरदार हाणामारी झाली. या राड्यात भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर, शिंदे गटाचे मुकेश कोट (माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा) आणि आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले.

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी खडकपाडा पोलिसांनी धाव घेतली आणि दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे, पण निवडणुकीच्या तोंडावर हा वाद महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

बॅनर वाद कसा उफाळला?

मिळालेल्या माहितीनुसार, शहाड स्टेशन परिसरात भाजपचे वॉर्ड क्रमांक १५ चे अध्यक्ष मोहन कोणकर यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छांसाठी एक लोखंडी फ्रेम लावली होती. या फ्रेमवर ते स्वतःचा बॅनर लावणार होते. मात्र, शिंदे गटाचे कार्यकर्ते मुकेश कोट यांनी त्याच फ्रेमवर आपला बॅनर लावण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

“माझ्या फ्रेमवर तुम्ही बॅनर लावू शकत नाही, साईडला लावा,” असे कोणकर यांनी सांगितले, तर मुकेश कोट यांनी “ही जागा आमची आहे” असा दावा केला. वाद वाढत गेला आणि अखेर हातघाईला प्रोत्साहन मिळाले. पाईपने मारहाण करत चार-पाच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला केला. या मारामारीत दोघांना डोक्यात आणि इतर ठिकाणी दुखापत झाल्या, तर तिसरा कार्यकर्ताही जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर ताब्यात घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर यांनी घटनेबाबत सांगितले की, “माझ्या घराजवळ माझे बॅनर लावलेले असतात. मी एक बॅनर आणला होता, जो उद्या लावणार होतो. मागच्या वेळी मी त्यांची फ्रेम लावली होती, त्यांचा बॅनरही लावला होता. आता त्यांनी माझ्या बॅनरवरच बॅनर लावायला घेतला. साईडला लावायला हवा होता. बॅनरवाल्याने गणेश कोट यांना फोन केला, त्यानंतर तो आला आणि आमच्यावर हात उचलायला लागला

‘तुमची जागा आहे का?’ असं बोलायला लागला आणि पाईपने मारायला लागला. मग चार-पाच जणांनी त्याला मारलं. गणेश कोट हा माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचा आहे. तो दादागिरी करतो, लोकांना त्रास देतो. आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलो आहोत.” कोणकर यांनी हेही सांगितले की, शिंदे गटाचे कार्यकर्ते नेहमीच स्थानिक पातळीवर दादागिरी करतात.

शिवसेना (शिंदे गट) चे मुकेश कोट यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “आमचा बॅनर लावायला रेल्वेच्या कंपाऊंडला एक मुलगा गेला होता. तिथे मोहन कोणकर म्हणून भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यांनी तो बॅनर तिथे लावू दिला नाही. ‘तिथे माझे बॅनर लागतात. इथं तुम्ही बॅनर लावायचे नाहीत. तुम्हाला लावायचे असतील तर दुसरीकडे लावा’ असं ते म्हणत होते.

त्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी जागेवर पोहोचलो तर त्यांनी मला तसंच बोलायला लागले. त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिललेले होते. त्यांनी माझ्यावर अटॅक केला, चार-पाच जण होते. त्यांनी मारायला सुरुवात केली. बॅनरवरून हे सर्व झालं आहे. आम्ही पोलिस तक्रार दिली आहे.” मुकेश कोट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मद्यप्रवृत्त असल्याचा आरोप केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!