Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘चांगला नेता म्हणून त्यांना भविष्यात संधी पण…’; गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

‘चांगला नेता म्हणून त्यांना भविष्यात संधी पण…’; गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई: मुंबईत आज झालेल्या स्टील महाकुंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबाबत आणि ग्रीन स्टीलविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या स्टील उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे. मात्र, पुढील आठ वर्षांत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या मदतीने मोठी पावले उचलणार आहे. यावेळी ग्रीन स्टील ही महाकुंभाची प्रमुख थीम असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रीन स्टील प्रकल्पांसाठी तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख नवीन रोजगार निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्हा नवीन स्टील हब म्हणून विकसित होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावर ग्रीन स्टीलची मागणी वाढत असल्याने महाराष्ट्र या क्षेत्रात मोठी झेप घेणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली. ‘कुठल्याही राजकीय मतभेदांमध्ये विरोधकांच्या वडिलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल भाष्य करणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी स्वतः पडळकरांशी चर्चा केल्याचे स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, ‘पडळकर हे तरुण नेते आहेत. मात्र बोलताना अतिरेकी आक्रमकता टाळणे आवश्यक आहे. चांगला नेता म्हणून त्यांना भविष्यात संधी आहे, त्यामुळे वक्तव्य करताना त्याचा परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे.’ याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना संदर्भातही भूमिका स्पष्ट केली. योजनेसाठी गोळा करण्यात आलेल्या डेटावर कोणतेही गैरसमज राहू नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!