Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेचा काटा काढला; मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच लपवला, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेचा काटा काढला; मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच लपवला, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime: अनैतिक संबंधांच्या संशयावरून पुण्यात एका ३५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात भाजप विधी शाखेचा शहराध्यक्ष एडव्होकेट संजय सावंत याच्यासह त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुनम दिनेश मुन असे मृत महिलेचे नाव असून, त्या सावंत याच्या कार्यालयात मागील साडेतीन वर्षांपासून सचिव (सेक्रेटरी) म्हणून कार्यरत होत्या.

नेमकं प्रकरण काय?
मुंढवा भागात एडव्होकेट संजय सावंत यांचे कार्यालय आहे. पुनम मुन आणि संजय सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंतची पत्नी स्वाती हिला होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. गुरुवारी (१६ एप्रिल) दुपारी कार्यालयात हा वाद विकोपाला गेला. यावेळी संजय सावंत, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलगी या तिघांनी मिळून पुनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

अत्याचार आणि हत्येचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुनम यांचे पाय दोरीने बांधले आणि बॅटने त्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात पुनम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि ते पोते ऑफिसमध्येच लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी संधी मिळताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा कट होता.

पतीनेच उघडकीस आणले हत्याकांड
पुनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी संजय सावंतला फोन केला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश मुन संशयावरून थेट सावंतच्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे त्यांना एक संशयास्पद पोते दिसले. ते उघडले असता, त्यांना स्वतःच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!