Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आनंदाची बातमी ! आता तुम्हाला ‘या’ सरकारी विभागात मिळू शकते नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

आनंदाची बातमी ! आता तुम्हाला ‘या’ सरकारी विभागात मिळू शकते नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, महिला परिचर, सफाई कर्मचारी आणि चौकीदार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही १० ऑक्टोबर २०२५ रोजी घेतली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी ओआयसी, एसटीएन मुख्यालय (ईसीएचएस सेल) आयएनएस, मुंबई येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!