Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kodak ने लाँच केला Matrix स्मार्ट टीव्ही; कमी किमतीत मिळतील ‘हे’ बेस्ट फीचर्स

Kodak ने लाँच केला Matrix स्मार्ट टीव्ही; कमी किमतीत मिळतील ‘हे’ बेस्ट फीचर्स

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Kodak ने त्यांचा नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. कंपनीच्या नवीन मॅट्रिक्स सीरीजमधील स्मार्ट टीव्ही चार स्क्रीन साईजच्या पर्यायात मिळणार आहेत. ही कंपनीची नवीन QLED Google टीव्ही सीरीज असणार आहे.

Kodak च्या ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच आणि ६५-इंच स्क्रीन साईजमध्ये स्मार्ट टीव्ही मिळत आहे. ब्रँडचे नवीन टीव्ही बजेट युजर्सला लक्ष्य करून लाँच केले गेले आहेत. या टीव्ही सीरीजच्या किंमती २०००० रुपयांपेक्षा कमी किमतीत सुरू होतात. कंपनीने बेझल-लेस डिझाइन आणि प्रीमियम QLED डिस्प्ले वापरले आहेत. या टीव्हीमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Kodak च्या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये स्लीक बेझल-लेस डिझाइन आहे. त्यात HDR १०+ सह प्रीमियम QLED ४K डिस्प्ले देण्यात आला आहे. टीव्ही डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी डिजिटल+ ला सपोर्ट करतात. टीव्हीच्या या सीरीजमध्ये चार स्पीकर्स वापरले गेले आहेत, जे ६०W चा आवाज मिळतो. हे सर्व टीव्ही गुगल टीव्हीवर चालतात आणि गुगल असिस्टंटला सपोर्टही करतात.

क्रोमकास्ट आणि एअरप्ले देखील बिल्ट-इन आहेत, ज्यामुळे नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, डिस्ने+ हॉटस्टार, झी५ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येऊ शकणार आहे.

किंमत काय?

Kodak क्यूएलईडी स्मार्ट टीव्ही चार स्क्रीन ऑप्शनमध्ये मिळत आहे. ४३-इंच व्हेरिएंटची किंमत १८७९९ आहे. ५०-इंच व्हेरिएंटची किंमत २३९९९ आहे, ५५-इंच व्हेरिएंटची किंमत २७६४९ आहे तर ६५-इंच व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!