नवी दिल्ली : जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि EPF अंतर्गत नोंदणीकृत असाल, तर एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. EPFO ने पासबुक लाईट सुविधा सुरू केली आहे. आता, सदस्य लॉग-इन न करता फक्त एका क्लिकवर त्यांच्या संपूर्ण PF खात्याची माहिती पाहू शकतील.
तुम्ही तुमच्या PF खात्याची माहिती थेट पोर्टलवरून पाहू शकता. आतापर्यंत, तुमचा PF शिल्लक किंवा व्यवहार तपासण्यासाठी, तुम्हाला पासबुक पोर्टलवर स्वतंत्रपणे लॉग इन करावे लागत होते. नवीन पासबुक लाईट सुविधा ही समस्या दूर करणार आहे. जरी तुम्हाला तुमच्या फोनवर मेसेज येत नसले तरी तुम्ही आता फेसबुक लाईटद्वारे तुमच्या PF खात्यात जमा केलेली रक्कम तपासू शकता.
कर्मचारी त्यांच्या योगदानाची, पैसे काढण्याची आणि एकूण शिल्लक रकमेची संपूर्ण माहिती थेट सदस्य पोर्टलवर पाहू शकतील. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी एका कार्यक्रमादरम्यान या सेवेची घोषणा केली. या सुधारणेमुळे PF सदस्यांची सोय वाढेलच, शिवाय विद्यमान पासबुक पोर्टलवरील भारही कमी होईल.
पासबुक लाईटचे काय फायदे?
सर्वात मोठा फायदा असा होईल की, तुम्हाला आता वेगवेगळ्या माहितीसाठी अनेक ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती मिळेल. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमची सर्व पीएफ माहिती मिळवू शकता. तपशील देखील जलद शोधता येतात, ज्यामुळे वेळ वाचतो. शिवाय, पासवर्ड लक्षात ठेवण्याचा त्रास देखील दूर होईल.


