नवी दिल्ली : OnePlus ने दिवाळी सेलची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये कंपनीच्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि IoT प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट दिला जात आहे. OnePlus दिवाळी सेल आजपासून सुरू होत आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून या सेलचा लाभ घेऊ शकता.
Flipkart, BlinkIt आणि इतर प्लॅटफॉर्मवर हा सेल उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. या सेल दरम्यान स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. तुम्ही OnePlus 13 Line Up अनेक हजार रुपयांच्या सूटवर खरेदी करू शकता. OnePlus १३R ला दिवाळी सेल दरम्यान देखील सूट मिळत आहे. ४२९९९ मध्ये लाँच झालेला हा फोन सेल दरम्यान ३५७४९ मध्ये उपलब्ध असणार आहे. फोनच्या किमतीत ५००० चा डिस्काउंट दिला जात आहे.
OnePlus 13s वर देखील चांगली डील आहे. 54999 मध्ये लाँच झालेला हा फोन सेल दरम्यान 47749 मध्ये उपलब्ध असणार आहे. त्याची किंमत 4000 ने कमी आणि 3250 ची बँक सूट मिळत आहे. तर OnePlus 13 हा फोन 57749 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. फोनची किंमत 8000 ची कमी आणि ₹4250 ची बँक डिस्काउंट देखील मिळत आहे.


