पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, निबंधक/कार्यालय अधीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कार्यशाळा प्रशिक्षक, लिपिक आणि रेक्टर (मुले) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार असून, सदर मुलाखत ही २४ ते २६ सप्टेंबर २०२५ यादरम्यान होणार आहे. त्यासाठी शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नाशिक येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://siernashik.org.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


