Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बडतर्फ IAS अधिकारी पूजाच्या पालकांविरुद्ध लूकआउट सर्क्युलर नोटीस जारी; फरार कुटुंबीयांचा शोध सुरू

बडतर्फ IAS अधिकारी पूजाच्या पालकांविरुद्ध लूकआउट सर्क्युलर नोटीस जारी; फरार कुटुंबीयांचा शोध सुरू

नवी मुंबई: बडतर्फ प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पालकांविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी लूकआउट सर्क्युलर जारी केला आहे. पोलीस सध्या पूजा यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा शोध घेत आहेत, जे गेल्या नऊ दिवसांपासून फरार आहेत. या प्रकरणाशी संबंधित एका अज्ञात व्यक्तीचा शोध देखील पोलिस घेत आहेत. दरम्यान, खेडकर कुटुंबाचा ड्रायव्हर-कम-बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखे पोलिस कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई आणि पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या पुणे येथील घराला चौकशीसाठी भेट दिली त्या दिवशीच दिलीप, मनोरमा आणि त्यांचा अंगरक्षक फरार झाले. सुरुवातीला दिलीप आणि अंगरक्षक लँड क्रूझर गाडीतून पळून गेले, तर मनोरमा खेडकर सुमारे 30 मिनिटांनी घटनास्थळ सोडले. अंदाजे दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान तिघेही आरोपी फरार झाले.

पोलिसांच्या अंदाजानुसार, दिलीप आणि त्यांचा अंगरक्षक पुण्याहून अहमदनगरकडे निघाले. दिलीप खेडकर यांनी अंगरक्षकाला गाडीतून उतरवले आणि स्वतः लँड क्रूझरने फरार झाले. त्यानंतर अंगरक्षक थेट धुळे येथे पोहोचला. पोलिसांना संशय आहे की, दिलीप खेडकर गाडी कुठेतरी लपवून फरार आहेत.

पोलिसांनी दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध ट्रक क्लीनर अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे, तर मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि पुरावे नष्ट करणे या गुन्ह्याची नोंद केली आहे. खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घराला चौकशीसाठी भेट दिली असता, पोलिसांना अपहरणात वापरलेली गाडी सापडली. तथापी, पोलिस चौकशीसाठी गेले असता मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवर कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या पोलीस खेडकर कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!