Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण; आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण; आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

नंदुरबार: शहरातील मार्केट परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत एका तरुणाची किरकोळ वादातून चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. सिंधी कॉलनी परिसरातील भैय्या मराठे या व्यक्तीने जय भिलवर प्राणघातक हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या जय भिलला उपचारासाठी सुरत येथे हलवले गेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हत्येनंतर आदिवासी समाजात संताप पसरला असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाच्या समर्थनार्थ नंदुरबार जिल्ह्यात मूक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. सुरुवातीला शांततेत सुरू असलेला मोर्चा काही वेळात हिंसक वळण घेऊ लागला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.

आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेकही झाली. या संघर्षात एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्यासह अनेक जखमी झाले असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नंदुरबार शहरातील आदिवासी समाज बांधव आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी ठाम भूमिका घेत आहेत. त्यांचा आग्रह आहे की आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण कायम असून प्रशासन नागरिकांमध्ये शांतता राखण्यासाठी सतर्कतेने उपाययोजना करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!