Railway Diwali Bonus 2025: केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने 1,866 कोटींचा उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) मंजूर केला असून, त्यामुळे 10.90 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. हा बोनस दिवाळीपूर्वी दिला जाणार असून, यासाठी केंद्र सरकारने 1,865.68 कोटींची तरतूद केली आहे.
बोनस कोणाला मिळणार?
ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्टर, सुपरवायझर, तंत्रज्ञ, मदतनीस, पॉइंटमेन, रेल्वे मंत्रालयाचे कर्मचारी आणि इतर पात्र गटांना हा लाभ मिळेल. तथापी, अधिकाऱ्यांना बोनस मिळणार नाही. याशिवाय, रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केलेले नाही.
परंपरेप्रमाणे, पूर्व भारतातील (बंगाल, बिहार) कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी, तर उत्तर भारतातील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळतो. तज्ञांच्या मते, जवळपास 1,900 कोटींची रक्कम बाजारात खर्च होणार असून, कपडे, बूट आणि घरगुती वस्तूंवर खरेदी वाढेल. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीला चालना मिळेल.


