Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Diwali Bonus: यंदा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची दिवाळी गोड होणार! राज्य सरकार देणार ‘इतका’ बोनस

Diwali Bonus: यंदा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची दिवाळी गोड होणार! राज्य सरकार देणार ‘इतका’ बोनस

मुंबई: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त मोठी भेट जाहीर करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या कामगारांना यंदा दोन हजार रुपयांचा बोनस भाऊबीज म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 40.61 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.

लहान मुलांची देखभाल, त्यांचे पोषण व सर्वांगीण विकास यासाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही आपल्या समाजातील एक शक्ती आहे. त्यामुळे त्यांचा सण अधिक आनंदात साजरा व्हावा हीच आमची भूमिका आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

भाऊबीजेची ही रक्कम एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत वितरित केली जाणार असून, जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्या देखरेखीखाली ती लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांतच हा बोनस मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!