Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Car Accident : पहाटे भीषण अपघात; भरधाव कार दुभाजकावर आदळली, ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Car Accident : पहाटे भीषण अपघात; भरधाव कार दुभाजकावर आदळली, ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Car Accident 5 Dead : दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरूग्राममधील झाडसा चौकात एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली चारचाकी गाडी चालकाच्या नियंत्रणातून सुटून थेट दुभाजकावर आदळली. या धक्कादायक अपघातात कारमधील सहापैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे. ही घटना शनिवारी (२७ डिसेंबर २०२५) पहाटे ४:३० च्या सुमारास घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून गुरूग्रामच्या दिशेने निघालेल्या या कारमध्ये तीन तरुण आणि तीन तरुणी असे एकूण सहा प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे चक्काचूर झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, वाहनाचा वेग प्रचंड होता, आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली.

या अपघातात दोन तरुण आणि दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये या दुर्घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपासात अपघाताचे नेमके कारण समोर येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!