Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘देणं हे मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं, खिशाच्या नव्हे; पुण्यातील भाजी विक्रेत्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना एका लाखाची मदत

‘देणं हे मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं, खिशाच्या नव्हे; पुण्यातील भाजी विक्रेत्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना एका लाखाची मदत

पुणे: पुण्यातील शनिपार चौकातील फूटपाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल 1 लाख 13 हजार 740 रुपयांचे दान दिले आहे. हा धनादेश आज कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वनवे हे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त असून त्यांच्या घरातील महाराजांच्या पादुकांसमोर एक डबा ठेवला आहे. भाजी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून दररोज 100 रुपये या डब्यामध्ये ठेवले जातात. ही बचत विशेषतः आपत्तीग्रस्तांसाठी केली जाते. आज या बचतीचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करून वनवे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रत्यक्ष उदाहरण सादर केले.

हेही वाचा – राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांत शाळांना सुट्टी; मराठवाडा-विदर्भाचा संपर्क खंडित, सोलापूरात महापूराची भीती

दरम्यान, हे दान सामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे कारण मोठ्या संस्थांव्यतिरिक्त, लहान व्यवसायांमधील साधे लोकही आपत्तीच्या काळात समाजाच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वनवे यांचा सत्कार करत त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. वनवे यांचे उदाहरण इतरांनाही सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!