Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या! जुन्नर तालुक्यांतील आदिवासी शाळेतील धक्कादायक प्रकार उघड

विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या! जुन्नर तालुक्यांतील आदिवासी शाळेतील धक्कादायक प्रकार उघड

Junnar News: जुन्नर तालुक्यांतील आदिवासी शाळेमध्ये मुलांच्या जेवणात आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी विभागाच्या दुर्लक्षामुळे गरीब आदिवासी मुलांचे आयुष्य धोक्यात आले होते. मुलांनी वेळीच ही बाब ध्यानी आणल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलांना दिल्या गेलेल्या राजमा- भातामध्ये मुलांना आळ्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी त्याबाबतची तक्रार केली. त्यामुळे इतर विद्यार्थी जेवण खाण्यापासून वाचले. याआधीही अनेकवेळा आदीवासी भागातील शाळांमधून असा प्रकार उघडकीस आला आहे.

खेड्या-पाड्यात विद्यार्थ्यी तसेच महिलांसोबत अनेक प्रकारे झालेल्या अत्याचारांच्या घटना समोर आल्या आल्याआहेत. जिथे शाळेत मुलांना मध्यांना भोजनाची चांगली व्यवस्था नाही. त्याशिवाय, या शाळांमध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक विनयभंगाच्या तक्रारींचाही समावेश आहे. मुलांवर लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारी असूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलीनसल्याच सांगितलं जात आहे. त्याहूनही भयावह म्हणजे आदिवासी शाळांमध्ये मुलींच्या गर्भधारणेच्या चाचण्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

वाकड येथील आदिवासी शाळेत मुलींना त्रास झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. पण सर्व असूनही प्रकल्प अधिकारी वरदहस्त असल्याने अजिबात भीती बाळगत नाहीत. आदिवासी मुलांच्या भविष्यासोबत असा उघडपणे खेळ होतो आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. राज्य सरकार लाखो रुपये खर्चून आदिवासी भागात शिक्षण प्रकल्प राबवत आहे. मात्र भ्रष्टाचार, बेफिकिरी आणि अधिकाऱ्यांमुळे गरीब मुलांना शिक्षणाऐवजी छळ, भूक व भीतीच मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!