Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पाऊस कोसळणार! 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पाऊस कोसळणार! 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Alert: मराठवाड्यात पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सप्टेंबरअखेर पावसाळा संपल्यानंतर थोडी उसंत मिळाल्याचे वाटत असतानाच पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विजयादशीच्या दुसऱ्याच दिवशी पावसाचे थैमान सुरू होणार असून पुढील 48 तास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसेच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी अद्याप मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

हेही वाचा – Pune : यंदाच्या मोसमात पुण्यावर वरूण राजाची विशेष कृपा; शहरात सरासरीपेक्षा ३३ टक्के तर जिल्ह्यात १६ टक्के जास्त पाऊसाची नोंद

दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा हवामान विभागाने दिलेल्या अलर्टमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील 48 तास मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार असून त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!