Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोंबड्याची अनोखी माया; पिल्लांचा बाप झाला ‘आई’, जगावेगळा ‘लाल्या’ बनला भोरचा स्टार

कोंबड्याची अनोखी माया; पिल्लांचा बाप झाला ‘आई’, जगावेगळा ‘लाल्या’ बनला भोरचा स्टार

भोर : प्राण्यांमध्ये पिल्लांचे संगोपन ही जबाबदारी नेहमीच मादीकडे असते, पण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वाठार हिमा गावातील ‘लाल्या’ नावाच्या कोंबड्याने सगळ्यांना थक्क केलंय. कोंबडीच्या मृत्यूनंतर लाल्याने १०-१२ पिल्लांची जबाबदारी स्वीकारली आणि अगदी आईप्रमाणे त्यांचे पालनपोषण करत आहे. या अनोख्या कृत्याने लाल्या गावाचा स्टार बनला असून, त्याला पाहण्यासाठी परिसरातून लोकांची गर्दी जमते आहे.

कोंबडीच्या मृत्यूनंतर लाल्याची माया

वाठार हिमा गावातील शेतकरी अर्जुन खाटपे यांनी पाळलेल्या एका कोंबडीने १०-१२ अंड्यांना उबवून पिल्लांना जन्म दिला. पण एके दिवशी ती पिल्लांसह अंगणात चरत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले. पिल्ले अनाथ झाल्याने खाटपे कुटुंबाला चिंता लागली. त्यांनी पिल्लांना घराच्या पडवीत ठेवले, पण इतर कोंबड्यांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. अशा वेळी अर्जुन यांच्या ‘लाल्या’ कोंबड्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

लाल्याने कोंबडीची भूमिका स्वीकारली आणि पिल्लांना आपल्या पंखाखाली घेऊन मायेची उब द्यायला सुरुवात केली. तो चोचीने पिल्लांना दाणे भरवतो, त्यांना अंगणात फिरायला घेऊन जातो आणि कावळे, घारी, मांजरे, कुत्र्यांपासून त्यांचे रक्षण करतो. लाल्या पिल्लांना क्षणभरही एकटे सोडत नाही, अगदी एखाद्या प्रेमळ आईप्रमाणे त्यांच्यावर लक्ष ठेवतो. याआधी कधीही न पाहिलेल्या या दृश्याने गावकरी थक्क झाले असून, लाल्याच्या प्रेमळ कृत्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

गावकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव

लाल्याच्या या अनोख्या कृत्याने गावात आणि परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेतकरी अलका खाटपे म्हणाल्या, “लाल्याने पिल्लांना दाखवलेली माया पाहून आम्ही भारावून गेलो. ही पिल्ले अनाथ झाली असती, पण लाल्याने त्यांना आपलंसं केलं. हा कोंबडा आता आमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे, आम्ही याला कधीच विकणार नाही.”

वयाने ८० वर्षांच्या पारुबाई खाटपे यांनीही भावूक होत सांगितलं, “माझ्या आयुष्यात असा चमत्कार प्रथमच पाहिला. लाल्या पिल्लांना ज्या प्रेमाने सांभाळतो, ते पाहून मन भरून येतं. त्याला पाहण्यासाठी गावासह परिसरातील लोक येत आहेत.” लाल्याची ही कहाणी आता गावाच्या सीमा ओलांडून सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, आणि त्याला पाहण्यासाठी स्थानिकांमध्ये उत्साह आहे.

लाल्याचं नवं कुटुंब

एरव्ही दूरपर्यंत फिरणारा लाल्या आता पिल्लांना सोडून क्षणभरही बाजूला जात नाही. तो पिल्लांना दाणे टिपायला शिकवतो, त्यांच्यासोबत अंगणात बागडतो आणि कोणत्याही धोक्यापासून त्यांचे रक्षण करतो. या पिल्लांना आई नसताना लाल्याने खऱ्या अर्थाने ‘आई-बाप’ दोघांचीही भूमिका पार पाडली आहे.

प्राणीप्रेमाची प्रेरणादायी कहाणी

लाल्याची ही कहाणी प्राणीप्रेम आणि ममत्व यांचे अनोखे उदाहरण आहे. ग्रामीण भागात अशा छोट्या घटना समाजाला मोठा संदेश देतात. लाल्याने दाखवलेली माया आणि जबाबदारी पाहून अनेकांचे मन जिंकले आहे. खाटपे कुटुंबानेही ठरवले आहे की, लाल्याचा शेवटपर्यंत सांभाळ केला जाईल. ही कहाणी केवळ गावापुरती मर्यादित नसून, ती प्राण्यांमधील ममत्व आणि निस्वार्थ प्रेम यांचे प्रतीक बनली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!