Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Pimpri Chinchwad Lift Accident: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी संध्याकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. चौवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीत राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान अचानक अडकली. त्यावेळी त्या लिफ्टमध्ये एक मुलगा अडकला असल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

दरम्यान, तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेल्या जवानांनी मुलाची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, मुलाचा खालचा भाग लिफ्टच्या दारात अडकला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Pune Crime : आधी बायकोचा खून, नंतर नवऱ्यानं स्वत:ला संपवलं, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे हादरलं

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर लिफ्टमध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झाला आणि मुलगा कशा परिस्थितीत अडकला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या भीषण घटनेने पुन्हा एकदा लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!