Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune : यंदाच्या मोसमात पुण्यावर वरूण राजाची विशेष कृपा; शहरात सरासरीपेक्षा ३३ टक्के तर जिल्ह्यात १६ टक्के जास्त पाऊसाची नोंद

Pune : यंदाच्या मोसमात पुण्यावर वरूण राजाची विशेष कृपा; शहरात सरासरीपेक्षा ३३ टक्के तर जिल्ह्यात १६ टक्के जास्त पाऊसाची नोंद

पुणे : यंदाच्या वर्षी मान्सून हंगामात पुणे शहर आणि जिल्ह्यावर वरूण राजाने विशेष कृपा केली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या मते, शहरात एकूण ८४९.२ मिमी पाऊस पडला आहे. तर, जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १,०९७ मिमी पाऊस पडला आहे.दरवर्षीच्या तुलनेत शहरात सरासरी ६३८.२ मिमी पाऊस पडतो आणि जिल्ह्यात ९४९.२ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी शहरात सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त पाऊस पडला आणि जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे राज्यात लवकर आगमन झाले. आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांवरून मान्सूनचे वारे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये प्रवेश करतात. ८ जुलैपर्यंत हे वारे देशभर पसरतात. दरम्यान, १७ सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनचे वारे माघार घेऊ लागतात आणि १५ ऑक्टोबरच्या सुमारास निघून जातात. मात्र, यावर्षी २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेले मान्सूनचे वारे अवघ्या दोन दिवसांत पुण्यात पोहोचले. २६ मे रोजी ते पुण्यात दाखल झाले. यावर्षी मान्सूनने पुण्यात आगमनाचे सर्व विक्रम मोडले. यापूर्वी १९६२ मध्ये मान्सून २९ मे रोजी पुण्यात दाखल झाला होता. यावर्षी मान्सून १४ दिवस आधी आला, ज्यामुळे ६३ वर्षांचा विक्रम मोडला. परिणामी, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरात पावसाला सुरुवात झाली.

जून आणि सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस

सर्वसाधारणपणे, मान्सून हंगामात जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु, या वर्षी मान्सून हंगामात जून आणि सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला. आकडेवारीनुसार, जूनमध्ये २६७.५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ६१ टक्के जास्त पाऊस झाला. जुलैमध्ये १३०.३ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा २८ टक्के कमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये १३४.७ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ७ टक्के कमी आणि सप्टेंबरमध्ये ३१६.७ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ११६ टक्के जास्त पाऊस पडला.

हवामान विभागाच्या मते, यावर्षी जून ते सप्टेंबर या अधिकृत मान्सून हंगामात शहरात ८४९.२ मिमी पाऊस पडला. शहरात सरासरी ६३८.२ मिमी पाऊस पडला. म्हणजेच यावर्षी ३३ टक्के जास्त पाऊस पडला. हवामान विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!