Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sindhudugr News : दुर्दैवी…! सिंधुदुर्गात समुद्राने गिळले अख्खं कुटुंब; चौघांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Sindhudugr News : दुर्दैवी…! सिंधुदुर्गात समुद्राने गिळले अख्खं कुटुंब; चौघांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Sindhudugr News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेलेल्या कुडाळ आणि बेळगाव येथील पर्यटकांवर काळाने घाला घातला. काल सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ९ पर्यटक समुद्रात बुडाले. यापैकी एक जण स्वतः बाहेर आला, तर एकाला वाचवण्यात यश आले. मात्र, आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले असून, तिघे अजूनही बेपत्ता आहेत.

काल सायंकाळी शिरोडा वेळागर समुद्रात ही घटना घडली. बचावकार्यासाठी रात्रभर शोधमोहीम सुरू होती. आज सकाळी आरवली सागरतीर्थ येथे आणखी एका पर्यटकाचा मृतदेह आढळला. मृतांमध्ये लोंढा-बेळगाव येथील कित्तूर कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये फरहान इरफान कित्तूर, इबाद इरफान कित्तूर आणि नमीरा आफताब अख्तर यांचा समावेश आहे. इसरा इम्रान कित्तूर (वय १७, लोंढा-बेळगाव) हिला समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

बेपत्ता असलेल्या पर्यटकांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, इक्वान इमरान कित्तूर (दोघेही लोंढा-बेळगाव), फरहान मोहम्मद मणियार आणि जाकीर निसार मणियार (दोघेही कुडाळ, सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. या बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.

ही घटना तळकोकणातील पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, पर्यटकांना समुद्रात उतरताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!