Nashik Wife Beating Case: नुकताच नवरात्री उत्सव पार पडला. नवरात्री म्हणजे देवीचा जागर जिथे आपण कन्यापूजा आणि महिलांचा सन्मान करतो. आज महिला पुरुषांच्या खांद्या खांदा लावून काम करतात. एकीकडे पुरुष महिला सामनातेच्या आपण गोष्टी करतो पण देशाच्या काणाकोपऱ्यात सोशल मीडियावर महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर योत आहेत. नाशिकचा एक व्हिडीओ आपल्या संस्कृतीला काळिमा फासणारा आहे. दिवसाढवळा एक तरुण तरूणीला केश धरुन बेदम मारताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेच्या वेळी लोकांनी बघ्याची भूमिका घेतली.
भर रस्त्यात मारहाण
नाशिकमधील पंचवटी भागात भर रस्त्यात पत्नीला अमानुषपणे पतीने मारहाण केली आहे. शिवीगाळ करत, केस धरुन पतीने पत्नीला मारहाण करताना दिसला. पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाचे नाव धीरज पवार असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीने पत्नीला मारहाण करण्यामागे ती नांदण्यासाठी येत नाही, म्हणून जाब विचारत तिला मारहाण करण्यात आली. धीरजला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला पोलिसांनी दणका दाखवल्यानंतर त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे.


