Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच; चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं संभाव्य वेळापत्रक

राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच; चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं संभाव्य वेळापत्रक

Local Government Elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक निवडणुका कधी होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. अशातच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा केला, मात्र अचूक तारीखाबाबत कोणतेही संकेत मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यांनी सांगितले की, दिवाळीनंतर पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची नोव्हेंबरच्या शेवटी, नगरपालिकांची निवडणूक डिसेंबरच्या शेवटी, तर प्रतीक्षेत असलेली महापालिका निवडणूक जानेवारीच्या शेवटी होईल.

आचारसंहितेचा आरंभ

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल. या आधी राजकीय नेत्यांना विकासकामांचे उद्घाटन पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या सूचनेमुळे इच्छुक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी तयारीला वेग मिळेल. पाटील यांनी विरोधकांना चिमटा काढत म्हटले की, निवडणूक कार्यक्रम जाहीर केला म्हणून असे म्हणायचे नाही की, माझा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे. गेली 40 वर्षे राजकारणात असल्याने अंदाज येतो.

कार्यकर्त्यांसाठी संदेश

दरम्यान, यावेळी त्यांनी सांगितलं की, निवडणुकीत वेगाची गरज आहे. 2019 मध्ये ज्यांचे तिकीट नाकारले गेले, त्यांना 2024 मध्ये संधी मिळाली. निवडणूक फास्ट ट्रेनसारखी आहे, प्लॅटफॉर्मवर जो राहील, तो ट्रेनमध्ये बसेल. जो मागे राहिला, त्याला संधी नाही. यामुळे नाराज होऊ नका, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं.

आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. जिल्ह्यात दहा आमदार महायुतीचे असल्याने, कार्यकर्त्यांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे. पाटील यांनी स्पष्ट केले की, निवडणुका होतील, पण कार्यकर्ता सदैव सोबत राहिला पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक वेळापत्रक, आचारसंहिता आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जाहीर करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग दिला आहे. या निर्णयामुळे आता राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!