Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: लोहियानगरमध्ये रिक्षा, कारसह 12 वाहनांवर दगडफेक; 4 अल्पवयीन मुले खडक पोलिसांच्या ताब्यात

Pune News: लोहियानगरमध्ये रिक्षा, कारसह 12 वाहनांवर दगडफेक; 4 अल्पवयीन मुले खडक पोलिसांच्या ताब्यात

Pune News: रिक्षामधून बाहेर काढून हटकल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांनी लोहियानगर येथील काशेवाडीतील पिंपळमळा येथील रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा, टेम्पो, कार अशा किमान १२ वाहनांवर दगडफेक केली. यात वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या त्यामुळे सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी ३ ऑक्टोंबर रोजी घडली. खडक पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

लोहियानगर झोपडपट्टीत घरे लहान असल्याने अनेक मुले ही बाहेरील रिक्षा, टेम्पो अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री थांबतात. मोबाइलवर गेम खेळत असतात. हुल्लडबाजी करतात. एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षामध्ये बसलेल्या मुलांना बाहेर काढले व रिक्षात बसण्यास मनाई केली.

त्याच्या रागातून पहाटे तीनच्या सुमारास चौघांनी तेथे पार्क केलेल्या रिक्षा, कार, टेम्पोवर दगड, लोखंडी सळईने मारून त्यांच्या काचा फोडल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्यांना हटकल्याने त्यांनी तोडफोड केली आहे. या चार मुलांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!