Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्वतःशी बोलण्यामुळे तणाव दूर होण्यास मदत

स्वतःशी बोलण्यामुळे तणाव दूर होण्यास मदत

महाराष्ट्र जागरण डेस्क: दोन व्यक्तींमध्ये एखादी तणावपूर्ण घटना घडल्यास तिसरी व्यक्ती व्यक्ती म्हणून जर आपण स्वतःशीच बोललो तर त्यामुळे कोणताही मानसिक ताण न घेता भावानांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे. खरे तर आपण तिसरी व्यक्ती म्हणून आपण आपल्याशी संवाद साधल्यास इतर व्यक्ती काय विचार करतात, ते किती योग्य व अयोग्य आहेत हे समजण्यास मदत होते.

आपण त्यासाठी मेंदूमध्ये पुरावा म्हणून राहू शकतो, असे अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे साहाय्यक प्राध्यापक जेसन मोसेर यांनी सांगितले. या संशोधनासाठी संशोधकांनी दोन प्रयोग केले. पहिल्या प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या लोकांना एक तटस्थ आणि त्रासदायक प्रतिमा पाहण्यास दिली. या वेळी पहिल्या आणि तिसऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये होणाऱ्या घटनांचे निरीक्षण करण्यात आले.

यामध्ये संशोधकांना जास्त फरक दिसून आला नाही. दुसऱ्या प्रयोगामध्ये सहभागींना भूतकाळातील त्रासदायक अनुभव पहिल्या आणि तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने सांगण्यात आला. मात्र यामध्ये सहभागी व्यक्ती स्वतःशीच बोलण्यामुळे त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा तणाव दूर होण्यास मदत झाली असे संशोधकांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!