पुणे : मुंबई येथील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई येथे असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर.
– एकूण रिक्त पदे : 21 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन, ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन (कुरिअरने).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोबर २०२५
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : rahul.khamkar@mahait.org
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड, तिसरा मजला, अपिजय हाऊस, दिनशॉ वाचा रोड, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://mahait.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


