Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis: आता तीन नाही चार मुंबई होणार! वाढवण बंदराजवळ चौथी मुंबईही उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis: आता तीन नाही चार मुंबई होणार! वाढवण बंदराजवळ चौथी मुंबईही उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज मोठ्या थाटात उद्घाटन झालं. मुंबई मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचं लोकार्पण आणि मेट्रो वन ॲपच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई उभारणार असल्याचं जाहीर केलं.

नवी मुंबई विमानतळ 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस, गेले 10 वर्ष मोदींच्या नेतृत्त्वात ज्या गोष्टी सांगतो आहोत, त्या प्रत्यक्ष लोकार्पित होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आपलं विमानतळ नवभारताचं प्रतीक आहे. याची संकल्पना 90च्या दशकातील होती. मुंबईहून पुण्याला जाताना बोर्ड लागलेला दिसायचा.काहीच पुढं व्हायचं नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

नवी मुंबई विमानतळ 9 कोटी प्रवासी हाताळू शकेल, हे विमानतळ इंजिनिअरिंग मार्बल आहे. नदी परिवर्तित करावी लागली, डोंगर क्लिअर करावं लागलं. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात हे विमानतळ महत्त्वाचं योगदान देईल. महाराष्ट्राचा जीडीपी 1 टक्क्यानं वाढेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तिसरी मुंबई प्रकल्प काय?

तिसरी मुंबईमध्ये पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करत रस्ते उभारणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी सिडको मोठा खर्च करणार आहे.

वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई

वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारलं जाणार आहे. वाढवण बंदरासाठी एकूण 76220 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या बंदरावर 9 कंटेनर टर्मिनल उभारली जाणार आहेत.त्यापैकी 4 टर्मिनल 2029 तर उर्वरित 5 टर्मिनल 2024 पर्यंत उभारली जातील. या बंदराजवळ आणखी एक विमानतळ उभारलं जाणार आहे. याशिवाय चौथी मुंबई तिथं उभारली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!