Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Radhakrishna Vikhe: विखे पाटील अंतरवाली सराटीत दाखल; जरांगे पाटलांची घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा

Radhakrishna Vikhe: विखे पाटील अंतरवाली सराटीत दाखल; जरांगे पाटलांची घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा

Radhakrishna Vikhe Patil: मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यासाठी ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे राज्यभरामध्ये ओबीसी समाज मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे 

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील या दोघांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होती हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. यानंतर सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले होते. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यावेळी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जरांगे पाटीलयांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली होती. मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पंधरा मिनिटांपासून बंद दाराआड चर्चा सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!