Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Siddharth Shirole : निलेश घायवळ प्रकरणात जामखेड कनेक्शन, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, वाचा..

Siddharth Shirole : निलेश घायवळ प्रकरणात जामखेड कनेक्शन, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, वाचा..

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात दररोज नवीन वळण येत असून, आता भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे () यांनी जामखेड कनेक्शन उघडकीस आणत खळबळजनक आरोप केले आहेत. घायवळला मिळालेला पासपोर्ट माविआ सरकारच्या काळात चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा दावा शिरोळे यांनी केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. घायवळ लंडनला फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना हे कनेक्शन राजकारणात उलथापालथ घडवत आहे.

जामखेड कनेक्शन काय?

आज (११ ऑक्टोबर २०२५) पत्रकारांशी बोलताना शिरोळे यांनी घायवळच्या पासपोर्ट प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत, “घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? हा प्रश्न मला पडला आहे. त्याने डिसेंबर २०२१ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि पोलीस व्हेरिफिकेशन १५ जानेवारी २०२२ ला पूर्ण झाले. त्याचा मूळ पत्ता सोनेगाव गाव, जामखेड तालुका असा नमूद आहे.”

ही प्रक्रिया माविआ सरकारच्या काळात सुरू झाली असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिरोळे म्हणाले, “पासपोर्ट देताना पोलिस पडताळणीत संशयास्पद बाबी समोर आल्या, जसे की बनावट पत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे दाखवणे. हा रिपोर्ट दबावाखाली दिला गेला का? त्यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार कोण होते? गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होते? याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी.” रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार असल्याने ही टीका अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर असल्याचे स्पष्ट झाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!