Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ED ची अनिल अंबानींवर कारवाई! रिलायन्स पॉवरचे CFO अशोक पाल यांना अटक

ED ची अनिल अंबानींवर कारवाई! रिलायन्स पॉवरचे CFO अशोक पाल यांना अटक

Reliance Power CFO Ashok Pal Arrested: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना अटक केली आहे. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असून, गुरुवारी रात्री दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. ED च्या तपासानुसार, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) यांनी मिळून 12,524 कोटींचे कर्ज वितरित केले होते. यापैकी बहुतांश निधी अनिल अंबानी समूहाशी संबंधित कंपन्यांकडेच वळवण्यात आला होता. तपासात पुढे उघड झाले की या कर्जांपैकी सुमारे 6,931 कोटींची रक्कम NPA (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स) म्हणून घोषित करण्यात आली आहे.

NDTVच्या अहवालानुसार, ईडीच्या प्राथमिक तपासात सर्क्युलर लेंडिंग म्हणजेच एकाच गटातील कंपन्यांमध्ये फिरवलेले कर्ज असे प्रकार उघडकीस आले आहेत. तपास यंत्रणेनुसार, येस बँकेचे तत्कालीन सीईओ राणा कपूर यांनी या कर्ज व्यवहारांना मंजुरी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राणा कपूर यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्या RAB Enterprises, Imagine Estates आणि Bliss House यांनाही या निधीतून कर्ज मिळाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

ग्रँट थॉर्नटन या ऑडिट फर्मने केलेल्या तपासात कर्ज वितरण प्रक्रियेत गंभीर धोरण उल्लंघन आणि निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ईडीने 60 कंपन्या आणि 22 व्यक्तींच्या ठिकाणी छापे टाकले असून, मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा – उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ; तब्बल 14 टक्क्यांनी वाढले शेअर

याआधी जून २०२५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांची खाती फसवी घोषित केली होती. ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सीबीआय कडे देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने स्वतंत्र गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. तपासात शेल कंपन्यांच्या जाळ्याद्वारे सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीतील रिलायन्स समूहाच्या कार्यालयांवर ईडीने छापे मारून महत्त्वाचे कागदपत्र आणि डेटा जप्त केला आहे.

दरम्यान, अनिल अंबानी समूहावर आर्थिक गैरव्यवहारांचे सावट पुन्हा गडद होत असून, अशोक कुमार पाल यांच्या अटकेमुळे रिलायन्स पॉवर आणि समूहाच्या आर्थिक स्थैर्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईडीचा तपास अद्याप सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!