Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महिलेचा विनयभंग करून सोनसाखळी पळविली; एका आरोपीला ठोकल्या बेड्या, तर दुसरा पसार

महिलेचा विनयभंग करून सोनसाखळी पळविली; एका आरोपीला ठोकल्या बेड्या, तर दुसरा पसार

उमरखेड (यवतमाळ): भावासह जात असलेल्या महिलेला दोन भामट्यांनी वाटेत अडविले. त्यानंतर महिलेचा विनयभंग करीत दोघांनाही बेदम मारहाण केली. शिवाय महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. ही घटना २० डिसेंबरला रात्री टाकळी मार्गावर घडली. घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

पीडित महिला २० डिसेंबरला रात्री ती मानलेला भाऊ बबन भाग्यवंत याच्यासोबत उमरखेडवरून टाकळीला जात होती. दरम्यान आरोपी कृष्णा तोंडारे व विजय भिमेवार (दोघेही रा. शिवाजी वॉर्ड, उमरखेड) यांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच पन्नास हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी महिलेसह तिच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर पीडित महिलेने प्रसंगावधान राखून मुलाला बोलाविले. तेव्हा त्यालाही आरोपीनी मारहाण केली. शिवाय महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन हिसकावून ते दुचाकीने भरधाव पसार झाले.

या घटनेची तक्रार प्राप्त होताच स्थानिक पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी व स्थानिक पोलिसांच्या पथकाने त्यातील आरोपी कृष्णा तोंडारे यास अटक केली. मात्र त्याचा साथीदार विजय भीमनवार हा पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!