आपल्यापैकी अनेकजण गिझरचा वापर करत असतील. कोणी गॅस गिझर तर कोणी इलेक्ट्रिक गिझर वापरत असेल. पण, तुम्ही गिझर वापरत असाल तर तुम्हाला याची माहिती असणे गरजेचे आहे. हिवाळा आधीच सुरू झाला आहे आणि येणाऱ्या काळात तापमान कमी होईल. अनेक लोकांना गरम पाण्याची गरज असते.
घरातील गॅस स्टोव्हवर वारंवार पाणी गरम करणे कठीण आणि असुरक्षित आहे. सुरक्षिततेसाठी, तुम्ही वॉटर हीटर गीझर खरेदी करू शकता. सध्या बाजारात अनेक प्रकारचे गिझर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरासाठी कोणते खरेदी करावे? हा प्रश्न उपस्थित होतो. गॅस गिझर इलेक्ट्रिक टँक गिझरपेक्षा पाणी जलद गरम करतो. टँक स्टोरेज असलेले इलेक्ट्रिक गिझर पाणी गरम करण्यास जास्त वेळ घेतात. १० लिटर टाकी क्षमतेच्या इलेक्ट्रिक गिझरची सुरुवातीची किंमत २५०० आहे तर गॅस गिझरची किंमत सुमारे ५००० रुपयांपर्यंत असणार आहे.
किंमतीची तुलना आपण केली तर इलेक्ट्रिक गिझर तुम्हाला परवडू शकतो. तर गॅस गिझर तुलनेने दुप्पट रकमेत मिळू शकतो. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गॅस गिझरच्या तुलनेत इलेक्ट्रिक गिझर जास्त वापरला जाऊ शकतो, असे अनेकांचा म्हणणे आहे. त्यानुसार, आता ग्राहक त्यांच्या गरज आणि इतर गोष्टी तपासूनच हे खरेदी करू शकतात.


