Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Motion Sensor Bulb : तुम्ही आत जाताच सुरु होतील लाईट अन् बाहेर पडताच बंदही होतील; किंमत फक्त….

Motion Sensor Bulb : तुम्ही आत जाताच सुरु होतील लाईट अन् बाहेर पडताच बंदही होतील; किंमत फक्त….

नवी दिल्ली : सध्या अनेक वस्तू स्मार्ट झाल्या आहेत. त्यात लाईट्सही स्मार्ट मिळत आहेत. जर तुमच्या घरातील लाईट तुमच्या कमांडने चालू आणि बंद होऊ शकत असतील तर? हो, आता हे शक्य झालंय. कारण, मोशन सेन्सर्स हे लाईट्स तुम्ही आत जाताच सुरु होतील लाईट अन् बाहेर पडताच बंदही होतील. हे लाईट्स परवडणाऱ्या दरात तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात.

जर तुम्हाला तुमचे घर हॉटेलसारखे वाटायचे असेल तर तुम्ही असे दिवे वापरू शकता. मोशन सेन्सर्स असलेले एलईडी दिवे खूप परवडणारे आहेत. तुम्ही ते ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असे अनेक दिवे मिळू शकतात. हॅलोनिक्स ब्रँडचे बल्ब एक चांगला पर्याय आहेत. हा १० वॅटचा बल्ब मोशन सेन्सर फीचरसह येतो. त्यात ऑटो-ऑन आणि ऑटो-ऑफ फीचर्स आहेत. हॅलोनिक्सच्या १० वॅटच्या बल्बची किंमत १४७ रुपये आहे आणि तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करता येतो.

५०० रुपयांच्या कमी किमतीत पॅनासॉनिक बल्ब देखील मिळत आहे. कंपनीकडून ९ वॅटचा मोशन सेन्सर बल्ब दिला जात आहे. हा बल्ब तीन मीटरच्या परिघात कोणी आल्यावर चालू किंवा बंद होतो. हा बल्ब फक्त १५ सेकंदात बंद होतो. कंपनी त्यावर १ वर्षाची वॉरंटी देखील देते. त्याची किंमत फक्त १५२ रुपये आहे.

Phillips चा बल्ब फक्त 178 मध्ये

फिलिप्सचा मोशन सेन्सर बल्ब देखील या बजेटमध्ये येतो. त्याची किंमत १७८ रुपये आहे. हा ९ वॅटचा बल्ब मोशन सेन्सरसह येतो. ६ मीटरच्या परिघात कोणीतरी आल्यावर लाईट चालू होतो. जेव्हा कोणीही उपस्थित नसते तेव्हा बल्ब इको मोडमध्ये जातो. आणि जर तीन मिनिटांसाठी कोणी येत नसेल तर लाईट बंद होतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!