Today मंगळवार, 16th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

पुणे: दिवाळीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील 17 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर, विशेष शाखेतील (स्पेशल ब्रँच) पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अजय संकेश्र्वरी यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांची पोलीस निरीक्ष गुन्हे म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेतील निरीक्षक संदिपान पवार यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

अरूण हजारे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, गुरूदत्त माेरे यांची नांदेड सिटी पोलिस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांची येरवडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. मंगेश हांडे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांची मुंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची वानवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची कोंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!