Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी..! सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक

मोठी बातमी..! सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक

Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अखेर पोलिसांनी पहिली अटक केली आहे. फलटण पोलिसांनी प्रशांत बनकर या आरोपीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार आहे. या दोघांविरोधात मानसिक आणि शारीरिक छळ तसेच बलात्काराचा आरोप आहे.

महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोघांची नावे स्पष्टपणे नमूद केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर फलटण पोलिसांनी शुक्रवारी रात्री दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती.

अटक केलेला प्रशांत बनकर हा डॉक्टर ज्या घरात राहत होती त्या घरमालकाचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. तर दुसरा आरोपी PSI गोपाल बदने याच्यावर डॉक्टरला सतत त्रास देण्याचे गंभीर आरोप आहेत. या दोघांच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तळहातावरच सुसाईड नोट लिहिली होती, यामध्ये आरोपींची नावे नमूद केली आहेत. डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या दोघांविरोधात कठोरात कठोर शिक्षा आणि फाशीची मागणी केली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून काही नेत्यांवर देखील आरोपांचे वारे सुरू झाले आहेत.

महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार

दिवाळीच्या सणासाठी घरी येण्याची तयारी करणाऱ्या या डॉक्टरच्या निधनाच्या वृत्ताने तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान तिच्या आई-वडिलांचा आणि भावाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावले. शेतीत कष्ट करून मुलीला डॉक्टर बनवणाऱ्या कुटुंबाचे स्वप्न चुराडले गेले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!