पुणे : भारतीय रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 29 ऑक्टोबर, 2025. रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मध्य रेल्वे येथे अर्धवेळ दंत शल्यचिकित्सक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अर्धवेळ दंत शल्यचिकित्सक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 29 ऑक्टोबर 2025.
– मुलाखतीचा पत्ता : डीपीओ कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, विस्तारित इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० ००१.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


