Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भरधाव कारने ८ जणांना चिरडले, ५ जणांचा जागेवर मृत्यू; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

भरधाव कारने ८ जणांना चिरडले, ५ जणांचा जागेवर मृत्यू; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Uttar Pradesh Highway Crash Five Killed : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील नागला बुधी परिसरात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव टाटा नेक्सन कारने दुचाकीसह रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एस.एन. मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने कारचालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

या भीषण घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी जखमींवर तातडीने आणि उत्तम उपचार करण्यात यावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!