Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Phaltan Crime: कोण आहेत ते खासदार, ज्याचं नाव लेडी डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये आढळलं? मृत्यूपूर्वी तिनं कोणाला केला होता फोन?

Phaltan Crime: कोण आहेत ते खासदार, ज्याचं नाव लेडी डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये आढळलं? मृत्यूपूर्वी तिनं कोणाला केला होता फोन?

Phaltan Crime: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या या डॉक्टरने तिच्या डाव्या तळहातावरच सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत तिने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बडणे आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर यांच्यावर गेल्या पाच महिन्यांपासून वारंवार बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

डॉक्टरने याबाबत डीएसपींपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेक पत्रे लिहून मदतीची विनंती केली होती, मात्र कोणीही तिची दखल घेतली नाही. अखेर तिने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. तपासादरम्यान पोलिसांना चार पानांची आणखी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात एका खासदार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मृत्यूपूर्वी डॉक्टरने एका आरोपीला फोन करून मेसेज पाठवला होता, मात्र त्यांच्या संभाषणाचा तपशील अद्याप उघड झालेला नाही.

महिला डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलच्या खोलीत फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. कुटुंबियांनी राजकीय दबावाचा आरोप करत सांगितले की, रुग्णाशिवाय फिटनेस आणि पोस्टमॉर्टम अहवाल तयार करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. तिने या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र कुणीच कारवाई केली नाही.

मृत्यूपूर्वी कोणाला केला होता फोन?

पोलिस तपासानुसार, आत्महत्येपूर्वी डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात फोन कॉल आणि मेसेजेसची देवाणघेवाण झाली होती. ती पुण्यात प्रशांत बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. आत्महत्येनंतर पीएसआय गोपाल बडणे यांना निलंबित करण्यात आले असून तो सध्या फरार आहे. डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये एका खासदाराचे नाव घेतले असून, त्या खासदाराने तिच्यावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

सरकारची तत्काळ कारवाई

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिसांना जलद आणि निष्पक्ष तपासाचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर गोपाल बडणे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं, ज्यांनी संरक्षण द्यायचं, तेच शोषण करत असतील, तर न्याय कुठून मिळणार? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत सातारा पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!