Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘धंगेकर अन्याय विरोधात लढणारा कार्यकर्ता’; मोहोळ यांचा विषय काढताच, शिंदे आणि धंगेकरांच्या चेहऱ्यावर हसू

‘धंगेकर अन्याय विरोधात लढणारा कार्यकर्ता’; मोहोळ यांचा विषय काढताच, शिंदे आणि धंगेकरांच्या चेहऱ्यावर हसू

पुणे: आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आले होते. या पुणे दौऱ्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत रवींद्र धंगेकर देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर हे जैन बोर्डिंग होस्टेल जमीन प्रकरणांमध्ये भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेली जैन बोर्डिंग होस्टेलची कोट्यावधीची जागा काही कोटींमध्ये गोखले बिल्डर यांना विकण्यात आली असून यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा देखील हात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.

यापूर्वी देखील रवींद्र धंगेकर यांनी कोथरूडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी मुख्यामंत्र्यांनी मधे येऊन सूचक वक्तव्य करत धंगेकरांच्या बॉसशी बोलाव लागले असं म्हटलं होतं. त्यावर रवींद्र धंगेकर यांना महायुतीमध्ये दंगे नको, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत रवींद्र धंगेकर हे सातत्याने टीका करत असल्याच पाहायला मिळाले.

आता जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या मुद्द्यावरून धंगेकर सातत्याने मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करत असून याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र पाठवले आहे. त्यासोबतच खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा आणि जो जमिनीचा व्यवहार झाला आहे तो रद्द करावा, या मागणीसाठी धंगेकर आता आंदोलन देखील पुकारणार आहेत.

दरम्यान, यावेळी सध्या सुरू असलेल्या वादाबाबत एकनाथ शिंदे यांना विचारला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देताना एकनाथ यांच्या पाठीमागे धंगेकर उभे होते. या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांकडे कटाक्ष टाकला दोन्ही नेत्यांमध्ये हास्याची लकेर उमटली.

त्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी धंगेकरांना सांगितले आहे की महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. आता तो विषय संपलेला आहे. त्यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली त्याबाबत ते बोलले मात्र आता मी त्यांना सांगितले आहे. आपली महायुती आहे आणि महायुतीच्या विरोधात आपल्याला विरोधकांना कोलित द्यायचे नाही. धंगेकर हे काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि अन्याय विरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी यापूर्वी स्पष्ट केला आहे की भाजपच्या विरोधात माझी भूमिका नाही. आता जे काही प्रकरण सुरू होते. त्यावर देखील पडदा पडेल आणि हा विषय संपेल.’

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!